पान:महाराजा सयाजीराव 'शिवसृष्टी'चे निर्माते.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वसबुधू, दिग्नाग, धर्मकीर्ती आणि अश्वघोष यांचे तत्त्वज्ञान स्वीकारण्याची गरज आहे, अशी क्रांतिकारक मांडणी के ली. कॉ. शरद पाटलांच्या मांडणी मार्गे जेव्हा आपण भट्टाचार्यांच्या योगदानाकडे पाहतो तेव्हा सयाजीरावांच्या शाक्त धर्माबाबतच्या द्रष्टेपणाची साक्ष मिळते.
 वरील तपशिलांना पूरक बाबी म्हणून पुढील बाबींचा उल्लेख करता येईल. १८९६ च्या बडोद्यातील वेदोक्त प्रकरणानंतर सयाजीरावांनी आपल्या राजवाड्यातील सर्व धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने करण्याचा आदेश काढला. त्यानंतर आपल्या राजवाड्यात वेदोक्त पद्धतीने होणाऱ्या धार्मिक विधींचा अर्थ व हेतू समजून घेण्यासाठी सयाजीराव २ ते ३ वर्षे संस्कृत शिकले होते. २६ सप्टें बर १९०९ ला विठ्ठल रामजी शिंदेंच्या पुण्यातील डिप्रेस्ड क्लास मिशनच्या पुणे येथील शाळे च्या बक्षीस वितरण समारंभास महाराज आले असता स्वागतावेळी महार, मांग व चांभार या जातीच्या तीन स्त्रियांनी महाराजांना ओवाळले होते. सयाजीरावांनी वेगवेगळ्या प्रांतातील व जातीधर्मांचे पदार्थ राजवाड्यात बनवले जावेत यासाठी मुसलमान, पारसी, मद्रासी, हिंदुस्थानी आणि फ्रें च इ. स्वयंपाकी राजवाड्यातील स्वयंपाकघरात नेमले होते. १८८७ मध्ये पहिल्या परदेशवारीदरम्यान सयाजीरावांनी युरोपातून कॅ सल यांचा

‘Dictionary of Cookery’ हा ग्रंथ मराठीत भाषांतर करण्याचे

महाराजा सयाजीराव ‘शिवसष्टी’चे निर्माते / २३