पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येवो असे मी मनापासून इच्छितो. ती उत्तम रीतीने पार पाडण्यास माझी मदत आपणास पाहिजे असल्यास ती देण्यास मी मोठ्या खुशीने तयार होईन."

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे संकल्पचित्र

 मराठा शिक्षण परिषद स्थापन व्हावी यासाठी मुंबईतील अनेक व्यक्ती जनजागृती करत होत्या. ब. का. गायकवाड, जागृतिकार पाळेकर, ज.ज. सावंत इ. व्यक्ती विविध लेखांच्या माध्यमातून मराठा शिक्षण परिषद स्थापनेविषयी आपले विचार मांडत होत्या. ज.ज. सावंत यांनी एका लेखात मराठा शिक्षण परिषद लवकरच भरेल अशी आशा व्यक्त करतानाच तिच्या कार्याची रूपरेषा पुढीलप्रमाणे मांडली होती.

 १) परिषदेने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करणे.

 २) प्राथमिक शाळा प्रत्येक खेडेगावात काढण्याचा प्रयत्न करणे.

 ३) प्राथमिक शाळेत सवड असल्यास धंदे शिक्षणाकडे लक्ष देणे.

 ४) परिषदेच्या शाखा, पोटशाखा व एजंट हे अनुक्रमे जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी आणि खेडेगावी असणे.

 ५) ठिकठिकाणांच्या वजनदार गृहस्थांना व सरकारी अंमलदारांना विद्याहीन लोकांतर्फे त्यांची स्थिती कळवणे व त्यांची योग्य सल्ला आणि मदत घेणे.

 ६) प्राथमिक शिक्षण फंड गोळा करणे.

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / १३