पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धामणस्कर यांनी त्यांच्या मृत्युपत्रामध्ये अखिल भारतीय मराठी शिक्षण परिषदेच्या कामासाठी आर्थिक मदत देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार धामणस्कर यांच्या पत्नी जानकीबाई धामणस्कर यांनी या फंडासाठी ७५ हजार रु. ची देणगी दिली. या परिषदेच्या निमित्ताने मराठा समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी astara एकूण ३ लाख रुपये 'पुरविले'. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम ८३ कोटी २० लाख रुपयांहून अधिक भरते. बडोद्यातील ही परिषद अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या इतिहासातील क्रांतिकारक टप्पा होता. कारण या अधिवेशनात जेवढा निधी उभा राहिला तेवढा निधी त्यानंतरच्या कोणत्याही परिषदेत उभा राहिला नाही. खऱ्या अर्थाने या अधिवेशनानिमित्त सयाजीरावांनी दिलेल्या भक्कम आर्थिक पाठबळाने मराठा शिक्षण परिषद पुढे भरीव योगदान देऊ शकली. दुर्दैवाने आजवर मराठा समाज या क्रांतिकारक इतिहासापासून अनभिज्ञ राहिला. या व्यतिरिक्त बंगलोरचे बी. व्यंकटराव (४०,००० रु.) आणि सरदार शंभूसिंग राजे (१,००० रु. रोख रक्कम व ५ हजार रु. ची पॉलिसी) यांनी मराठा शिक्षण परिषदेच्या कार्यास भक्कम आर्थिक आधार पुरविला.

 या अधिवेशनाच्या निमित्ताने खासेराव जाधव यांच्या विनंतीवरून महाराजांनी मराठा फंडासाठी सुरुवात म्हणून मोठी रक्कम दिली. खासेराव जाधवांनी त्यामध्ये स्वतः चे २५ हजार रु. घातले. बडोद्यातील या मराठा फंडाचे खासेराव अध्यक्ष होते.

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / २३