पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुरू केले. हा इतिहास आपल्याला परिचित आहे. परंतु असाच कायदा पटेल बिल येण्याअगोदर १० वर्षे 'विशेष विवाह कायदा - १९०८' बडोद्यामध्ये लागू झाला होता हे आपल्याला माहीत नसते.
 शाहू महाराजांनी घडवून आणलेल्या आंतरजातीय विवाहाला ज्याप्रमाणे पटेल बिलाची पार्श्वभूमी होती त्याचप्रमाणे बडोद्याच्या या संदर्भातील कायद्यांचाही भक्कम आधार होता हे शाहू महाराजांच्या पुढील पत्रावरून स्पष्ट होते. ३० जानेवारी १९१८ ला शाहू महाराजांनी बडोद्याच्या दिवाणांकडून सयाजीरावांनी लागू केलेल्या विवाह आणि जातीबाबत कायद्यांच्या पुस्तकांच्या काही प्रती मागवल्या होत्या. या संदर्भातील पत्रात शाहू महाराज म्हणतात, "I learn H.H. the Maharaja Saheb has made laws for Baroda Rajya to correct certain social abuses in matters of marriage, degrading caste customs & c. and that in the Penal Code also some changes have been made. I should very much like to see these laws and shall feel obliged if you can very kindly let me have copies containing them."

 हे पत्र सयाजीरावांच्या कायद्यांची उपयुक्तता आणि ऐतिहासिकता अधोरेखित करते. बाबासाहेब सयाजीरावांवरील मृत्युलेखात म्हणाले होते की बडोद्याचे कायदे हे इंग्लंड- अमेरिकेपेक्षाही पुढारलेले आहेत. राजर्षी शाहूंचे वरील पत्र आणि

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / २१