पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याअगोदर ११ वर्षे म्हणजे १९९३ ला झालेला राजघराण्यातील पहिला मराठा-आदिवासी आंतरजमातीय विवाह महाराष्ट्राला माहीत नाही.

 ३ फेब्रुवारी १९१८ रोजी बडोद्याचे खासेराव जाधव यांना लिहिलेल्या पत्रात शाहू महाराजांनी डिसेंबर १९९७ मध्ये झालेल्या खामगाव येथील अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अध्यक्षीय भाषणाची चर्चा केली आहे. या भाषणात 'आपण जातिभेद मोडले पाहिजेत या उद्देशाने आपण आर्य समाजाची म्हणजे वस्तुत: वैदिक धर्माची शाखा स्थापन केली. ढोंगी बोलण्यापेक्षा खरे स्पष्ट बोलणे कधीही श्रेयस्कर आहे. मळमळीत सौभाग्यापेक्षा झळझळीत वैराग्य चांगले.' अशी भूमिका घेऊन जातिभेद मोडण्यासाठी बेटी व्यवहार करण्याची गरज शाहू महाराज व्यक्त करतात. याच पत्रात पुढे ते आंतरजातीय विवाहाचा सूतोवाच करतात. आपल्या कुटुंबापासूनच या मोहिमेची सुरुवात झाली पाहिजे अशी भूमिकाही मांडताना पुढे ते लिहितात, "म्हणून आपल्या धर्माचा वैदिकपणा कायम ठेवून जातींचा अडथळा कमी करण्याला आर्यसमाज सध्याच्या काळी चांगले साधन आहे असे वाटते. पुराणांतरी देव व राक्षस यांच्यात व उच्च व कनिष्ठ वर्णात विवाह झाल्याचे आधार आहेत. हल्लीच्या काळींसुद्धा क्षत्रिय मराठ्यांचे संबंध शूद्रांशी झालेले आहेत. कुचबिहारशी तर आमचा संबंध झालाच आहे. इंदूरकरांनी तालचेरकराशी संबंध केला आहे. तेव्हा आता

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / २९