पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कालाचा बोध पाहून जामनगर, राजाड, इंदूर, कुचबिहार वगैरे हिंदु राजघराण्यांशी "Bloodrelationship" घडून येईल असे करण्यास आम्ही तयार असले पाहिजे."
 आंतरजातीय विवाहाचा आपल्या कुटुंबापासून आरंभ करण्याचा मनोदय शाहू महाराज सर्वप्रथम बडोद्याच्या खासेराव जाधवांसमोर व्यक्त करतात. याला १९९३ च्या इंदिराराजेंच्या मराठा - आदिवासी विवाहाचा संदर्भ आहे. खासेरावांना ते मित्र आणि मार्गदर्शक मानत होते. खासेराव सयाजीरावांच्या खास मर्जीतले होते. हे सर्व संदर्भ विचारात घेता ब्राह्मणशाहीचा नांगा जिरवण्यासाठी शाहू महाराज कोल्हापूर-इंदूर या धनगर विवाहाचे जे शस्त्र वापरणार होते त्यासाठीचे सर्वात मोठे नैतिक पाठबळ म्हणून शाहू महाराज बडोद्याकडे पाहत होते असा निष्कर्ष निघतो.
 सयाजीराव महाराजांची एकुलती कन्या इंदिराराजे यांनी कूचबिहार या आदिवासी संस्थानातील राजकुमार जितेंद्र नारायण यांच्याशी स्वत:च ठरवून विवाह केला होता. विशेष म्हणजे सयाजीरावांनी ग्वाल्हेरच्या माधवराव शिंदे यांच्याशी त्यांचा विवाह ठरवला होता. असे असतानाही सयाजीराव या विवाहात स्वतःची प्रतिष्ठा आडवी न येऊ देता खंबीरपणे मुलीच्या पाठीशी उभे राहिले.
 सयाजीरावांना पाच अपत्ये होती. त्यामध्ये ज्येष्ठ पुत्र फत्तेसिंहराव, जयसिंहराव, शिवाजीराव, कन्या इंदिराराजे आणि सर्वात लहान धैर्यशीलराव होते. इंदिराराजे या चौथे अपत्य असून

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ३०