पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणाले, “लग्नासारख्या बाबतीत आईबापांचा आग्रह काय कामाचा! आपण चार मुलांच्या माता, अनुभवी आहा, मी आपणास शिकवावेसे नाही. पण मला एक समजते की, सहा महिन्यांचे मूलदेखील आपल्या आईला औषध पाजू देत नाही, मग ही आपली कन्या इंदिरा सुशिक्षित असता आपले म्हणणे खरे केल्याशिवाय कशी राहील? तिच्यावर नजर ठेवा, कदाचित् जिवास एखादा अपघात करून घेईल.” सरदेसाईंच्या या बोलण्याचा चिमणाबाईंवर अपेक्षित परिणाम होऊन हळू- हळू त्यांनी आपला आग्रह सोडून दिला. लेडी टोटनहॅम या चिमणाबाईंच्या शिक्षिका होत्या. त्यांनीही याबाबत महाराणी चिमणाबाईंना समजावण्याचा प्रयत्न केला. मुले मोठी झाली आहेत, थोडे त्यांच्या कलाने घ्यावे अशी विनंती त्यांनी महाराणींना केली होती.
 सरदेसाईंचा चिमणाबाईंचे मन वळवण्याचा हा प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी झाला. परंतु सयाजीरावांसमोर हे प्रकरण कोण मांडणार? असा प्रश्न सरदेसाई व इंदिराराजेंना पडला. प्रत्यक्ष सयाजीरावांना इंदिराराजे काही सांगण्यास गेल्या तर ते त्यांना गप्प बसवत. त्यामुळे इंदिराराजे सयाजीरावांना काहीच सांगू श नव्हत्या. मुलांनी आपल्या मनातील विचार आई-वडिलांना नाही सांगायचे तर कोणाला सांगायचे. पण महाराजांचा स्वभावच असा झाला होता की, कोणाचेही काम अगोदर ठरविल्याशिवाय कोणीही वाटेल तेव्हा भेटून अचानकपणे आपले म्हणणे सांगू

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ३६