पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इंदिराराजेंची 'स्वतंत्र' निर्णयक्षमता
 पुढे वर्षभरात इंदिराराजेंनी कूचबिहारच्या महाराजांचे बंधू राजकुमार जितेंद्र नारायण यांच्याशी स्वतःच विवाह जुळविला. सयाजीराव इंदिराराजेंसह स्वित्झर्लंडला गेले. तेथून त्यांनी इंदिरांना चिमणाबाईंच्या सेक्रेटरी कु. टॉटेनहॅम आणि कॅप्टन परब यांच्याबरोबर लंडनला पाठविले. विवाहाच्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. तर इंदिराराजेंच्या ताब्यात असलेल्या दागिन्यांची यादी खजिनदारांकडे सोपवण्यात आली. २५ ऑगस्ट १९१३ रोजी लंडनमध्ये इंदिराराजेंचा विवाह ब्राह्मो समाजाच्या रीतीप्रमाणे झाला. महाराज व महाराणी मात्र या विवाहास हजर नव्हते. १९११ ते १९९३ अशी तीन वर्षे इंदिराराजेंचा हा विवाह सयाजीरावांना अस्वस्थ करत होता. त्यामुळे त्यांना खूप मानसिक त्रास झाला.
 कूचबिहारचे राजघराणे ब्राह्मोसमाज पंथाचे असून बंगालमधील समाज सुधारकांमध्ये अग्रगण्य समजले जात होते. तेथील राजमाता सुनीतीदेवी या ब्राह्मोसमाजाचे प्रसिद्ध पुढारी केशवचंद्र सेन यांच्या कन्या होत्या. इंदिराराजे यांचा विवाह झाल्यानंतर थोड्याच दिवसांनी तेथील राजपदावर असलेले महाराज दिवंगत झाले. त्यामुळे त्यांचे लहान भाऊ जितेंद्र नारायण यांना राजपद मिळाले व इंदिराराजे ओघानेच कूचबिहारच्या महाराणी झाल्या. परंतु महाराणी चिमणाबाईंनी

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ४१