पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केली; पण आजोबांकडून एक शब्दही गेला नाही. आजोबांनी जावयाला फक्त एवढीच अट घातली की लेकीला व्यक्तिगत खर्चापोटी एक लाख रुपये त्यांच्याकडून मिळावेत.
 माझ्या आईने डोळ्यांत पाणी आणून केलेली अखेरची क्षमायाचनाही व्यर्थ ठरली. तिने आजीचे आशीर्वाद मागितले, पण प्रतिसाद मिळाला नाही. पण मिस टॉटेनहॅमने सांगितलं की, आई खोलीतून बाहेर पडल्याबरोबर आजी धाय मोकलून रडायला लागली. तथापि तिने पुढची दोन वर्ष आईशी कोणताही संपर्क ठेवला नाही. १९९४ मध्ये माझ्या मोठ्या बहिणीचा इलाचा जन्म झाला तेव्हा आई खूप आजारी पडली. तेव्हा कुठे आजीचा राग निवळला आणि तिने पुन्हा आईशी संबंध प्रस्थापित केले. पण ते करण्याची तिची पद्धतही विशेष होती. आपल्या लेकीला खास बडोद्याचे पदार्थ खायला मिळावेत म्हणून तिने कूचबिहारला एक मराठा आचारी पाठवला.
 माझ्या आई-वडिलांचं लग्न झालं, त्याच सुमाराला कूचबिहारच्या घराण्यातल्या एका प्रेमप्रकरणाचा दु:खद शेवट झाला. माझ्या वडिलांचे मोठे भाऊ म्हणजे माझे काका कूचबिहारचे महाराजा राजा राजेंद्रनारायण हे एडना मे नावाच्या इंग्लिश नटीच्या प्रेमात पडले होते. पण त्यांच्या कुटुंबाने या लग्नाला विरोध केला. दोन वर्षापूर्वी त्यांनी कुटुंबीयांना सांगितलं की, असाच विरोध कायम राहिला तर मी विष पिऊन आत्महत्या करीन. १९१३ मध्ये ते खरोखरच फार आजारी पडले.

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ४६