पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माझ्या आईवडिलांच्या लग्नानंतर तीन आठवड्यांनी ते वारले. उरलेल्या तीन भावांपैकी मोठे म्हणून माझे वडील कूचबिहारचे महाराजा झाले.”
 इंदिराराजेंची कन्या गायत्रीदेवींनी आपल्या आत्मकथनात आपल्या आईंच्या क्रांतिकारक विवाहाची हकिकत वरीलप्रमाणे वस्तुनिष्ठपणे मांडली आहे.
 १९१४ मध्ये गायत्रीदेवींच्या मोठ्या बहिणीच्या जन्मावेळी आजारी पडलेल्या इंदिराराजेंशी महाराणी चिमणाबाईंनी पुन्हा एकदा संबंध प्रस्थापित केले. तर १९९८ मध्ये पुण्या गायत्रीदेवींचा दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ इंद्रजितेंद्रनारायण यांचा जन्म झाला. यादरम्यान पुण्यात भरणाऱ्या घोड्यांच्या शर्यतीला सयाजीराव महाराज आणि महाराणी चिमणाबाई उपस्थित होते. या पुणे मुक्कामामध्येच इंदिराराजे आणि त्यांचे आई-वडील यांच्यामध्ये पूर्ण समेट झाल्याचे गायत्रीदेवींनी नोंदवले आहे.
 गायत्रीदेवींनी स्वतःच्या टोपणनावाची 'गोष्ट' देखील सांगितली आहे. गायत्रीदेवींच्या वेळी गर्भवती असताना इंदिराराजे रायडर हॅगार्ड या परदेशी लेखकाची 'She' ही इंग्रजी कादंबरी वाचत होत्या. ही कादंबरी वाचत असतानाच आपल्याला मुलगी झाल्यास तिचे नाव आयेशा ठेवण्याचे इंदिराराजेंनी निश्चित केले होते. आयेशा हे त्या कादंबरीच्या नायिकेचे नाव होते. परंतु परंपरेनुसार मुलीच्या जन्मानंतर शकुनाचे अक्षर ‘ग’ आल्यामुळे मुलीचे नाव गायत्री ठेवण्यात

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ४७