पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आले. परंतु इंदिराराजे गायत्रीदेवींना आयेशा या नावानेच हाक मारत असत. गायत्रीदेवींच्या जन्मानंतर काही दिवसांनी घरी आलेल्या इंदिराराजेंच्या मुस्लिम मैत्रिणींनी आयेशा हे टोपणनाव ऐकले. तेव्हा त्या मैत्रिणींना धक्का बसला. या मुस्लिम मैत्रिणींनी आयेशा नावाचा खरा इतिहास इंदिराराजेंना सांगितला. त्यांनी सांगितल्यानुसार, आयेशा हे महंमद पैगंबरांच्या नवव्या आणि त्यांच्या सगळ्यात आवडत्या पत्नीचे नाव होते. तोपर्यंत गायत्रीदेवींच्या या टोपणनावाची सर्वांना सवय झाली होती. त्यामुळे गायत्रीदेवींचे हेच टोपणनाव रूढ झाले. मैत्रिणी आपल्याला याच नावाने हाक मारत असल्याचे गायत्रीदेवी आपल्या आत्मकथनात सांगतात.
इंदिराराजेंचा सुधारणावाद
 इंदिराराजेंच्या मातोश्री चिमणाबाई यांनी १९९० पासून सार्वजनिक जीवनात पडदा पद्धतीचा त्याग केला. आई- वडिलांचा सुधारणावाद मुलगीनेसुद्धा पुढे नेल्याचा दाखला इंदिराराजेंच्या १९१३ मधील पुढील कृतीवरून स्पष्ट होतो.
 इंदिराराजेंच्या कन्या गायत्रीदेवी यांनी आपल्या आजी सुनीतीदेवी आणि आई इंदिराराजे यांच्यातील मूलभूत फरक आपल्या आत्मचरित्रात स्पष्ट केला आहे. गायत्रीदेवींच्या आजी सुनीतीदेवी या ब्राह्मोसमाजाचे प्रसिद्ध नेते केशवचंद्र सेन

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ४८