पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १९८० नंतर भारतात स्त्रीवादी चळवळ विकसित झाली. परंतु ती विकसित होत असताना अभिनिवेश आणि परदेशी परंपरेची नक्कल यातच ती गुरफटली. परिणामी परिवर्तनापेक्षा प्रतिक्रियेतच तिची सर्व शक्ती 'वाया' गेली. १९९० नंतर स्त्री स्वातंत्र्याचे भारतीय 'नमुने' तिने आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. आंतरजातीय विवाहाची चळवळ एक पुरोगामी चळवळ म्हणून प्रतिष्ठित झाली. याच दरम्यान शाहू महाराजांच्या प्रयत्नाने परंतु शाहूंच्या मृत्यूनंतर १९२४ मध्ये शाहू महाराजांच्या जनक घराण्यातील चुलत बहिणीचा इंदूरचे राजे तुकोजीराव होळकर यांचा मुलगा यशवंतराव याच्याशी झालेल्या आंतरजातीय विवाहाची चर्चा पुरोगामी चळवळीने फारच जोरात केली. परंतु इतिहास तोडून आणि उथळपणे अभ्यासण्याच्या आपल्या 'आवडत्या छंदामुळे या विवाहाची प्रेरणा असणारा बडोद्याचा विवाह पुरोगामी चळवळीला माहीतसुद्धा नाही. इंदिराराजेंचा हा विवाह बडोद्यातील स्त्री उन्नतीच्या क्रांतीकार्याशी ' जोडून ' अभ्यासल्याशिवाय त्याचे वेगळेपण आणि ऐतिहासिकता समजणार नाही.
 महात्मा फुलेंना आपण भारतीय स्त्रीमुक्तीचे प्रणेते मानतो. महात्मा फुले स्त्रियांच्या उन्नतीसाठी लेखणी आणि कृतीद्वारे झगडले. परंतु फुलेंनी तयार केलेली स्त्री उन्नतीची 'पायवाट ' सयाजीरावांनी 'एक्सप्रेस वे'मध्ये रूपांतरित केली याची पुसटशी

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ७