पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बडोद्यात कागद निर्मिती, दोरखंड निर्मिती, ब्रश आणि काथ्या निर्मिती इ. उद्योगांच्या उभारणीची शक्यता तपासण्यात आली. गोंद निर्मिती, रबर आणि लाख तयार करण्याचे छोटे उद्योग सुरू करण्यासाठी उपयोग झाला.
३) नैसर्गिक वायू सर्वेक्षण
 कोडीनार तालुक्यातील जागतीया येथे १९९९ साली व बडोदामध्ये १९२१ साली नैसर्गिक वायूचे साठे सापडले. नैसर्गिक वायूच्या उत्खननासाठी विविध ठिकाणी बोअर मारण्यात आले. परंतु नैसर्गिक वायूचा प्रवाह आणि पुरवठा कमी होता. बडोद्यामध्ये २ ठिकाणी पाण्यासाठी बोअर मारत असताना मांडला नैसर्गिक वायू सापडला. यातील एका विहिरीतील नैसर्गिक वायूचा प्रवाह तुलनेने अधिक होता.
४) कुंभारकामविषयक सर्वेक्षण
 १९२०-२१ मध्ये कुंभारकाम तज्ज्ञांना नियुक्त करून सर्व प्रकारच्या जातींचे शिक्षण करण्यात आले. त्याचबरोबर या मातीच्या भौतिक चाचण्यादेखील करण्यात आल्या. या सर्वेक्षणाच्या आधारे कुंभारकामविषयी उद्योग निर्मितीच्या शक्यता तपासण्यात आल्या.
५) औद्योगिक व आर्थिक सर्वेक्षण

 १८९३ मध्ये बडोदा संस्थानचे पहिले औद्योगिक सर्वेक्षण करण्यात आले. तीन शासकीय अधिकारी व एक बिगर शासकीय सदस्य असलेल्या समितीने प्रत्येक तालुक्याला भेट देऊन

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / १०