पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



(v) कातडी उद्योग
 १९०७ साली क्रोमचे कातडे कमाविण्यासंदर्भातील विविध प्रयोग करण्यासाठी अमेरिकेत प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञाला आमंत्रित करण्यात आले. या प्रयोगासाठी यंत्रसामग्रीदेखील खरेदी करण्यात आली. कलाभवनमध्ये हे प्रयोग करण्याचे योजले असताना प्रत्यक्ष प्रयोग सुरू होण्यापूर्वीच संयुक्त भांडवला कंपनीने ही यंत्रसामग्री खरेदी करून कारखाना सुरू केला. परंतु तज्ज्ञ व्यक्ती व खरेदीवर हे दोघेही अक्षम असल्यामुळे हा कारखाना बंद पडला.
(vi) कोनिको- प्रिंटिंग
 कलाभवनच्या सुरुवातीच्या काळात कोनिको- प्रिंटिंगसाठी यंत्रसामग्रीची खरेदी करण्यात आली. परंतु या संदर्भातील प्रयोग अयशस्वी ठरल्यामुळे यंत्रसामग्री विकावी लागली.
(vii) हातमाग

 पारंपरिक थ्रो - शात्र पद्धतीचे हातमाग बदलून नवीन प्रकारचे हातमाग तयार करण्यासाठी विविध प्रयोग केले. या प्रयोगानंतर नवीन प्रकारचा फ्लाय शटल हातमाग तयार करण्यात आला. रेशीम आणि लोकर विणकामामध्ये अनेक प्रयोग करण्यात आले. यासाठी विणकाम तज्ज्ञांची मदतनिसासह नेमणूक करण्यात आली.

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / १४