पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



वाढली. या एकूण कामगारांपैकी ८,६८३ पुरुष आणि २,९११ महिला होत्या. संयुक्त भांडवल असणाऱ्या कारखान्यांची संख्या १९११ मध्ये ३९ होती. त्यांचे एकूण भांडवल ६६ लाख ते ८८ लाख रुपयांच्या दरम्यान होते. १९२१ मध्ये हेच भांडवल ८ कोटी रुपयांवर पोहोचले व कारखान्यांची संख्याही बरीच वाढली. या उद्योगांमध्ये ओखा मीठ कारखाना, सयाजी स्टील वर्क्स, टाटा केमिकल्स, महाराणी उलन मिल, अश्विनी उद्योग, मत्स्य व्यवसाय, डिंक उद्योग, पेटलाड येथील पेन्सिल निर्मितीचा कारखाना, मातीची भांडी निर्मितीचा कारखाना अशा विविध क्षेत्रांतील उद्योगांचा समावेश होतो. सयाजीराव उद्योगांच्या विकासाबाबत किती गंभीर होते हे त्यांच्या विविध धोरणांतून अनेकदा स्पष्ट झाले आहे. याचे आणखी एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे रावबहादूर आंग्रे यांनी सादर केलेल्या अहवालानुसार उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या कर्जाची मर्यादा त्यांनी दीड लाखांवरून ५ लाखांवर नेली.
वाणिज्य व उद्योग विभाग
 सुरुवातीला वाणिज्य, व्यापार आणि शेती विकसित करण्याच्या महत्त्वपूर्ण कामांना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आर्थिक समस्यांमध्ये व्यक्तिगत रस घेणाऱ्या काही नायब- दिवाणांच्या साहाय्याने महसूल विभागाकडे सोपविण्यात आले. सन १९०५ मध्ये वाणिज्य, उद्योग, शेती, सीमाशुल्क आणि इतर काही संबंधित शाखांचा प्रभारी विशेष अधिकाऱ्यांच्यामहाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / २७