पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ज्या वस्तूंवर शुल्क भरले आहे ते ब्रिटिश भारतात विनाशुल्क दाखल केले जातील.
 ३) जर उद्योगाची नफ्यामध्ये उभारणी होत असेल तर त्या उद्योगाच्या उभारणीचा संपूर्ण खर्च अर्जकर्त्याला करावा लागेल, अन्यथा सरकार अर्जकर्त्याची ठेव परत करेल.
 ४) उद्योगांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने काही रक्कम कर्जरोख्यांच्या रूपाने बाजूला काढण्यात आली. कर्जरोख्यांच्या माध्यमातून राज्याच्या वतीने उद्योगांना आर्थिक मदत देऊन उद्योगांची सहकारी तत्त्वावरील तपासणीची व्यवस्था तयार करण्यात आली.
 ५) बडोद्यात नवीन उद्योग सुरू करणाऱ्या व्यक्ती महाराजा सयाजीरावांच्या उदारमतवादी धोरणांचा लाभ घेऊन राज्यात नवीन उद्योग सुरू करतील अशी सयाजीरावांना आशा होती.

 भारत सरकार व बडोदा सरकार यांच्यात व्यापारासंदर्भातील काही नियम ठरवण्यात आले. याचा परिणाम म्हणून ओखाबंदरामुळे राज्याचा आयात निर्यात व्यापार वाढून राज्यातील महसूल वाढला. परिणामी राज्य विकासाच्या दृष्टीने मार्गक्रमण करू लागले. मुंबई, कलकत्ता, मद्रास यांच्या खालोखाल ओखाबंदर हे महत्त्वाचे बंदर म्हणून ओळखले जाऊ लागले.

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / ३९