पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिवणकाम, लाकूड कोरीव 'काम, चामड्याच्या वस्तू, काचेची खेळणी बनवणे, चित्रकला इ. चे प्रशिक्षण देण्यात आले. संपूर्ण संस्थानातील कारागिरांना त्यांच्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून भांडवल व कच्चा माल पुरवण्यात आला. या कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंना हीरकमहोत्सवी कुटिरोद्योग संस्थेच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली. या संस्थेने विसनगर पितळ उद्योग व सानखेडा येथील लाख उद्योगावर लक्ष केंद्रित करून आर्थिक अडचणीत सापडलेले हे उद्योग वाचवले.
बडोद्यातील प्रमुख उद्योग
 १) महाराणी उलन मिल,
 २) डायमंड ज्युबिली कॉटन मिल,
 ३) बडोदा डेअरी,
 ४) अश्विनी इंडस्ट्रीज,
 ५) सयाजी मेटल वर्क्स,
 ६) टाटा केमिकल्स,
 ७) अलेम्बिक केमिकल वर्क्स,
 ८) साराभाई केमिकल वर्क्स,
 ९) अलेम्बिक ग्लास फॅक्टरी,
 १०) सिमेंट फॅक्टरी, द्वारका,

 ११) फर्निचर कारखाना,

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / ४६