पान:महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यानंतर राजवाड्यांत मेजवानीच्या वेळी टेबलावर पाने मांडण्याची पद्धत सुरू केली. पण प्रत्येक जातीची टेबले व त्यांचे खालची बिछायत वेगळी ठेवण्याची जबाबदारी घेतली. ते लोकांच्या अंगवळणी पडल्यानंतर सर्वांना बिछायत एकच, पण टेबले मात्र वेगळी असे एक पाऊल पुढे टाकले आणि आता आमच्याकडे जेवण्याखाण्यात कोणी कसलाच जातिभेद पाळीत नाही. ज्ञानप्रसार व धीमेपणा या दोन कारणांमुळेच इतकी सुधारणा होऊ शकली.
निश्चयाने मनुष्य काय करू शकतो ? :
 ८. असली कृत्रिम बंधने ज्ञानप्रसाराने नष्ट करून समाजात ऐक्यभाव उत्पन्न करण्यासाठीच रा. भाऊरावांच्या या वसतिगृहासारख्या बोर्डिंगाची फार जरूर आहे. भाऊरावांचे हे कार्य फार श्रेष्ठ असून त्यात त्यांनी संपादन केलेले यश पाहून फार आश्चर्य वाटते. अशा नमुन्याचे वसतिगृह माझ्या संस्थांनातही काढण्याचा मी प्रयत्न करणार आहे. हे निश्चयाचे फळ असून निश्चयाने 'मनुष्य काय करू शकतो याचे हे जिवंत उदाहरण आहे.
खरा श्रीमंत कोण? :

 ९. या संस्थेला रा. ब. काळे व दादासाहेब करंदीकर हे चांगल्या प्रकारे साहाय्य करतात असे भाऊरावांनी आपल्या भाषणात सांगितले, ते ऐकून मला संतोष वाटला. परंतु ते असेही म्हणाले की, यात ते आपले कर्तव्यच करतात. या पलीकडे जास्त

महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील / १८