पान:महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाऊरावांच्या मनात आदर होता. तो आदर मुख्यतः प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि अस्पृश्यता निर्मूलन या दोन क्षेत्रातील सयाजीरावांच्या क्रांतिकारक यशाबद्दल होता. यासंदर्भात कर्मवीरांच्यावर संशोधन करणारे डॉ. आर. ए. कडियाळ म्हणतात, “ In the case of Maharaja Sayajirao Gaikwad, Bhaurao appreciated his far-sighted democratic administration in his state; his experiment of universal and compulsory free primary education; his attempt at eradication of untouchability;"

 जानेवारी १९३६ मधील सयाजीरावांच्या राज्यकारभाराच्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमाचे रयत शिक्षण संस्थेस आमंत्रण होते. हे आमंत्रण सयाजीरावांच्या मनातील भाऊराव आणि रयत शिक्षण संस्था यांच्याबद्दलच्या आपुलकीची साक्ष देणारे आहे. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या वतीने भाऊराव पाटील, एम. बी. मुथा, बी. एन. नलावडे आणि बी. एस. बारटक्के यांचे शिष्टमंडळ उपस्थित राहिले. यावेळी दरबारी रिवाजाप्रमाणे भाऊरावांच्या डोक्यावर पगडी नसल्यामुळे सडेकर-पवार यांनी त्यांना मंडपाच्या प्रवेशद्वारावर अडवून आत जाता येत नसल्याचे सांगितले. तेव्हा भाऊरावांनी त्यांना 'या वेशात तुम्ही मला आत जाऊ देत नसाल तर मी येथूनच परत जाईन' असे सडेतोड उत्तर दिले. दरम्यान सयाजीरावांनी व्यासपीठावरून प्रवेशद्वारावरील डोक्यावर पगडी नसणाऱ्या भाऊरावांना पाहिले. तेव्हा

महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील / २२