पान:महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 वरील सर्व संदर्भ विचारात घेता सयाजीराव आणि भाऊराव पाटील यांच्यातील कृतिशीलतेचा समान धागा या दोघांना जोडणारा प्रमुख दुवा होता हे स्पष्ट होते. महापुरुषांचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्याच्या आपल्या भूमिकेमुळे आपले किती बौद्धिक नुकसान झाले आहे याचा विचार आता आपल्याला करावा लागेल. कारण ज्याप्रमाणे विठ्ठल रामजी शिंदे, शाहू महाराज यांना सयाजीरावांच्या कार्याने प्रेरणा दिली होती. तशीच प्रेरणा कर्मवीर भाऊराव पाटलांना सयाजीराव, विठ्ठल रामजी शिंदे आणि शाहू महाराज यांनी दिली होती याचे दाखले खुद्द कर्मवीरांनीच नोंदवून ठेवले आहेत. म्हणूनच परंपरा मग ती पुरोगामी असो किंवा प्रतिगामी तिचा जोडून विचार केल्याशिवाय तिचे नेमके स्वरूप समजून 'घेणे शक्य होत नाही.

●●●
महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील / ३१