पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/११

हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांच्या या व्यासंगाचा तत्कालीन अनेक शाळांनी मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेतला.
ख्रिश्चन मुख्याध्यापकांना मराठी व संस्कृत शिकवले
 केळुसकर विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असताना डॉ. मॅकनिकल नावाच्या ख्रिश्चन मुख्याध्यापकांना मराठी व संस्कृत भाषा शिकण्याची इच्छा होती.तेव्हा केळुसकरांनी सुरुवातीला मॅकनिकल यांना मराठी भाषा शिकवली.मराठीमध्ये गती आल्यानंतर मॅकनिकल यांनी संस्कृतवर लक्ष केंद्रित केले.काळे नावाच्या शिक्षकांनी मॅट्रिकच्या वर्गापर्यंतचे संस्कृत शिकण्यास दोन वर्षे लागतील असे मॅकनिकल यांना सांगितले.तेव्हा केळुसकरांनी त्यांना अवघ्या ३ महिन्यांत संस्कृत व्याकरण आणि बोलण्याइतपत संस्कृत शिकविले. ३ महिन्यांनंतर मॅट्रिकच्या वर्गापर्यंतचे संस्कृत आपल्याला येत असल्याचे मॅकनिकल यांनी काळेंना सांगितले असता त्यांचा यावर विश्वास बसला नाही.
सत्यशोधक केळसकर

 नारायण मेघाजी लोखंडे यांच्या 'दीनबंधू' साप्ताहिकात केळुसकरांचे लेख सातत्याने प्रकाशित होत. त्याचबरोबर सत्यशोधक समाजाच्या सभांमध्ये केळुसकरांनी केलेल्या भाषणांचा सारांशदेखील 'दीनबंधू' मध्ये प्रकाशित होत असे. नीतिप्रसारक मंडळीच्या साप्ताहिक सभेत केळुसकर विविध विषयांवर भाषणे करत.नीतिप्रसारक मंडळीत सलग

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ११