पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जानेवारी-फेब्रुवारी १८९२ मध्ये केळुसकरांनी 'सुबोधपत्रिके'त ' आमचे सुशिक्षित लोक अल्पायुषी का होतात?” या विषयावर तीन अभ्यासपूर्ण लेख लिहिले. या लेखात त्यांनी स्वच्छता, सात्विक आहार, नियमित व्यायाम, सातत्यपूर्ण काम आणि शुद्धाचार या बाबींमुळे व्यक्तीचे आयुष्य वाढत असल्याचे प्रतिपादन केले होते. पुढे दोन वर्षांनी १५ एप्रिल १८९४ रोजी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी याच संदर्भात मुंबईच्या ग्रॅज्यूएट्स असोसिएशनच्या कार्यक्रमात 'व्हाय ग्रॅज्यूएट्स डा यंग?" या विषयावर व्याख्यान दिले. रानडे हे भारतातील अग्रगण्य बुद्धिजीवी होते. विशेष म्हणजे ते ब्राह्मण होते. केळुसकरांनी लिहिलेल्या लेखानंतर २ वर्षांनी रानडेंनी याच विषयावर व्याख्यान द्यावे यातच आधुनिक भारताच्या प्रबोधन परंपरेच्या पुनर्भ्यासाची गरज लपली आहे.
सुबोधप्रकाश नियतकालिक
 कृष्णराव अर्जुन केळुसकर हे नाव महाराष्ट्रालाच काय, पण इतिहास अभ्यासकांनाही फारसे परिचित नाही. परंतु मराठीतील गौतम बुद्ध, संत तुकाराम आणि शिवाजी महाराज यांची पहिली साधार आणि वस्तुनिष्ठ चरित्रे केळुसकरांनी लिहिली. केळुसकरांची जडणघडण सत्यशोधकी परंपरेत झाली होती. प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते मोरो विठ्ठल वाळवेकर यांच्या 'सुबोधप्रकाश' या नियतकालिकात केळुसकरांनी थॉमस पेनच्या 'राईट्स ऑफ मॅन' या महात्मा फुलेंवर सर्वात जास्त

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / २०