पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विद्याधिकाऱ्यांना विचारले की, “माझ्यातर्फेने तिघे असता, मला अनुकूल असता माझ्याकडचे काम काढून घेणार काय? किंवा मला ते पुढे चालविण्यास सांगावयाचे की कोणाच्या मताप्रमाणे चालवावयाचे?”
 सयाजीराव महाराजांच्या मूळ आदेशाप्रमाणे केळुसकरांनी मॅक्समुल्लरच्या ग्रंथाप्रमाणे उपनिषदांचे भाषांतर करणे अपेक्षित होते. परंतु केळुसकर मूळ संस्कृत ग्रंथांप्रमाणे हे भाषांतर करत होते. हाच विरोधी पक्षाच्या दोन सदस्यांचा मुख्य मुद्दा होता. परंतु इतर तीन सदस्यांनी केळुसकरांचे भाषांतर उत्तम झाल्याचा अभिप्राय दिला होता. केळुसकरांनी हा सगळा वृत्तांत महाराजांच्या कानावर घातला होता. त्यावर बडोद्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केळुसकरांना पुढील आदेश पाठवला, “तुम्हाला योग्य दिसेल त्याप्रमाणे काम करा, पुढे पाहता येईल. यापुढे तुमचे बाकीचे काम कमिटीकडे तपासावयास देण्यात काही एक अर्थ नाही. " या आदेशाप्रमाणे अखेर केळुसकरांनी उपनिषदांच्या भाषांतराचे काम पूर्ण केले. मराठा केळुसकरांना आलेला हा अनुभव म्हणजे पुढे बाबासाहेबांना बडोद्यात मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा 'पूर्वार्ध' होता.
टिळक आणि केळुसकर
 उपनिषदांच्या भाषांतरानंतर केळुसकरांनी भगवद्गीतेचे विवेचन करणारा 'श्रीमद्भगवगीता सान्वय पदबोध, सार्थ आणि सटीक' हा ग्रंथ लिहिला. १९०२ मध्ये प्रकाशित झालेला हा ग्रंथ

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ३१