पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लिंगोजी बिर्जे यांना देऊन हा ग्रंथ पूर्ण करण्यास सांगावे असा निरोप त्यांनी आबासाहेब दळवी यांना दिला. त्याचवेळी या टिपा बिर्जेंव्यतिरिक्त अन्य कोणाकडेही देऊ नये अशी स्पष्ट सूचना केळुसकरांनी दळवींना केली होती. कारण केळुसकरांच्या मते शिवचरित्राचे काम पूर्ण करण्यासाठी अन्य कोणीही व्यक्ती योग्य नव्हती.परंतु सुदैवाने डॉ. धुरू, डॉ. धारगळकर व डॉ. परमानंद यांच्या प्रयत्नांमुळेके ळुसकर या आजारातून बरे झाले.
 केळुसकर आजारी होण्यापूर्वी शिवचरित्राची ८० पाने छापून तयार झाली होती. पुढे हा पूर्ण झालेला ग्रंथ के ळुसकरांनी निर्णयसागर छापखान्यात छापून घेतला. त्यांनी हा ग्रंथ कोल्हापूरच्या शाहू महाराजांना अर्पण के ला होता. शाहू महाराजांनी या ग्रंथाला १००० रुपये रोख देऊन ५०० प्रती विकत घेतल्या. त्याचबरोबर महाराजा सयाजीराव आणि बापूसाहेब कागलकर यांनी या ग्रंथाच्या प्रत्येकी २०० प्रती विकत घेतल्या.
 केळुसकरांनी इंदुरचे महाराज तुकोजीराव होळकर यांच्या आज्ञेनुसार स्वलिखित मराठी शिवचरित्राच्या ५०० प्रती त्यांना पाठवल्या. आपल्या मित्रांना पाठवण्यासाठी तुकोजीराव महाराजांनी शिवचरित्राच्या या प्रती मागवल्या होत्या. परंतु के ळुसकरांनी शिवचरित्राच्या प्रती पाठवल्यानंतर तुकोजीराव महाराज संस्थानाबाहेर गेल्यामुळे या प्रती बराच काळ दरबारात तशाच पडून होत्या. ज्या पेट्यांतून या प्रती पाठवण्यात आल्या होत्या त्या पेट्या उघडल्यासुद्धा नसल्याची माहिती नंतर के ळुसकरांना मिळाली. के ळुसकरांचा हा अनुभव आपल्याला ‘आत्मटीके’कडे घेऊन जातो.

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अरजु्न के ळुसकर / 41