पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाले तेव्हाचा आहे. सिडनेहॅम कॉलेजच्या प्राचार्यपदी बाबासाहेबांची नेमणूक व्हावी यासाठीही केळुसकरांनी प्रयत्न केले होते. यासंदर्भात कीर लिहितात, “सिडनेहॅम कॉलेजचे प्राचार्यपद प्राध्यापक आंबेडकरांना मिळावे त्याकाळचे शिक्षणमंत्री ग्लर र. पु. . परांजपे यांची गुरुवर्यांनी भेट घेतली; परंतु डॉ. आंबेडकरांसारख्या सर्वोच्च पदव्या धारण केलेल्या अनुभवी प्राध्यापकाला ते पद काही मिळाले नाही. परांजपे मोठे सुधारक, उदारमतवादी नि विवेकवादी पुरुष, त्यांच्याही सुधारणावादास नि उदारमतवादास परंपरेच्या शृंखलांनी कसे जखडले होते ते पाहा."
 १९३० मध्ये बाबासाहेब पहिल्या गोलमेज परिषदेला अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून इंग्लंडला निघाले होते. बाबासाहेबांना शुभेच्छा आणि मदतीची थैली अर्पण करण्याचा कार्यक्रम मुंबई प्रांतातील अस्पृश्योद्धाराचे काम करणाऱ्या लोकांनी मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये आयोजित केला होता. यावेळी केळुसकरांनी ४ रु. ची आर्थिक मदत बाबासाहेबांना केली होती. आजच्या रुपयात या याचे मूल्य १०, १११ रु. होते. केळुसकरांची ही मदत म्हणजे शालेय जीवनापासून केळुसकरांनी बाबासाहेबांना दिलेल्या कृतिशील पाठबळाचाच भाग होता. १९३० च्या दरम्यान केळुसकर स्वतः फार मोठ्या आर्थिक संकटातून जात असताना त्यांनी ही मदत केली होती हे येथे ध्यानात घ्यावे लागेल.
 पुढे बहुधा १९३३ मध्ये केळुसकरांच्या शेवटच्या कालखंडात बाबासाहेबांनीही केळुसकरांना सहकार्य करण्याचा प्रयत्न

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ४६