पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
आणि
खासेराव जाधव

 राज्यकर्ता कितीही दूरदृष्टीचा असला तरी राज्यकारभार यशस्वी करण्यासाठी त्याला विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, इमानदार आणि प्रचंड कष्ट उपासण्याची तयारी असणाऱ्या साथीदारांची गरज असते. ज्ञानी लोक सोबत ठेवणे हे फार कठीण काम असते. कारण राज्यकर्त्याचा अहंकार टोकदार असतो. तज्ज्ञ आणि इमानदार साथीदार मात्र राज्यकर्त्याच्या अहंकारापेक्षा राज्याच्या कल्याणाचा विचार करत असतात. परिणामी राज्यकर्त्याला ज्ञान आणि ज्ञानी लोक यांचे वावडे असते. कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्तम काम करायचे असेल तर नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला आपल्या व्यक्तिगत आवडी-निवडी बाजूला ठेवून आपल्या मनाविरुध्द दिलेला सल्लासुध्दा स्वीकारावा लागतो. हे सर्व साधण्यासाठी राज्यकर्त्याकडे ज्ञानाबद्दलचा प्रामाणिक आदर आणि आपल्या सोबतच्या लोकांच्या कर्तबगारीबद्दलसुध्दा आदर असावा लागतो.

महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / ६