पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही.' गंगारामभाऊंच्या या विधानातून एक महत्त्वाची बाब स्पष्ट होते ती अशी की, मराठा जातीच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी उभे केलेले हे काम संकुचित जाती अभिमानातून हाती घेतले नव्हते तर एक राष्ट्रीय प्रश्न म्हणून व्यापक राष्ट्रीय उन्नतीच्या भूमिकेतून ते मराठ्यांच्या उत्कर्षाचा विचार करत होते.

 आज जेव्हा आपण गंगारामभाऊंच्या कामाचा विचार करतो तेव्हा त्यांचे ऐतिहासिक महत्त्व जास्त प्रकर्षाने जाणवते. कारण आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि मराठा जातीची विस्कटलेली आर्थिक घडी हा एक गंभीर प्रश्न म्हणून पुढे येत आहे. मराठा आरक्षणाचा गेली अनेक वर्षे सुरू असलेला संघर्ष आणि लाखोंच्या संख्येने प्रत्येक जिल्ह्यात निघालेले मोर्चे हे गंगारामभाऊंनी १३५ वर्षांपूर्वी हे काम का हाती घेतले होते याची प्रचिती देतात. गंगारामभाऊ २९ एप्रिल १९०१ ला विषमज्वराने मृत्यू पावले. डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन ही संस्था त्यांनी १८८३ ला सुरू केली. म्हणजे जेमतेम साडेसतरा वर्षे त्यांना हे काम करता आले. त्यांच्या मृत्यूनंतरही जवळजवळ ४० वर्षे सयाजीरावांनी या संस्थेला भक्कम आणि सर्वाधिक आर्थिक पाठबळ दिले. त्याचप्रमाणे इतर मराठा संस्थानिकांनीही आपल्या कुवतीनुसार या कामाला आर्थिक साहाय्य केले.यातून मराठ्यांच्या शैक्षणिक उन्नतीची चळवळ उभी राहिली. परंतु आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाने या क्रांतिकारक चळवळीची नोंद घेतली नाही. परिणामी त्यातून बोध घेण्याचा प्रश्नच उद्भव

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / ८