पान:महाराजा सयाजीराव आणि जलनियोजन.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डबकी, गाळ, स्मशानांतला केरकचरा वगैरे अनेक ठिकाणाची घाण जाऊन पोहोचते व मुळातच पाणी दूषित होते.' अशा प्रकारे अस्वच्छ पाणी प्रजेला प्यायला लागू नये म्हणून पाण्याचे स्त्रोत सुरक्षित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांच्या दूरदृष्टीमुळे बडोद्यातील प्रजेचे आरोग्य आपोआपच सुधारले.
 सयाजीराव महाराजांच्या मृत्युसमयी इ.स. १९३९ साली बडोदा राज्यात शेतीच्या आणि पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी पक्क्या विहिरी ७१,१९५, कच्च्या विहिरी १७,०१८, तलाव १०,१९५ आणि इतर साधने ५६४ होती. त्यामुळे लागवडीसाठी उपयुक्त जमिनींचे प्रमाणही वाढलेले होते. बडोदा राज्यात एकूण ८८,९०,४४२ बिघे जमिनीपैकी शेतीला उपयोगी अशी जमीन ७०,६०,८९२ बिघे होती. यापैकी ६६,८०,७९६ बिघे जमिनीची लागवडी खाली होती. हे महाराजांच्या जलनीतीचे यश होते.

 पाणी हे मनुष्यास जसे अत्यावश्यक आहेच तसे ते सुरक्षि पाहिजे असे महाराजांचे मत होते. 'अशुद्ध पाणी हा मनुष्याचा शत्रू आहे, पाणी म्हणजे ईश्वरी प्रसाद आहे. तिची नासधूस करू नका. जपून वापरा. पाणी सोन्याहूनही मौल्यवान आहे. पाणी म्हणजे प्रतिप्राणाच आहे.' अशा आशयाचे मार्गदर्शन नेहमी प्रजेला करत होते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा जपून वापर, पाण्याचा पुनर्वापर, बचत करणे, पाण्याचे स्त्रोत सुरक्षित ठेवणे हे महाराजांनी सुचवलेले उपाय अमलात आणण्याची आजही जरुरी आहे. 'दुष्काळातल्या दुर्धरप्रसंगी जगातील सगळी संपत्ती

महाराजा सयाजीराव आणि जलनियोजन / १३