पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चिकाटीचे व स्वार्थत्यागाचे आपण अनुकरण करावे. बडोद्यातून सरकारी खर्चाने पाठविलेले विद्यार्थी परदेशातून विद्यासंपन्न होऊन परत येतील. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग बडोद्याला होईल. '

 महाराजांना त्यांच्या शिक्षण काळात शिक्षकांनी नियमित डायरी लेखनाची सवय लावली होती. मे १९०० मध्ये महाराजांच्या ६ व्या युरोप दौऱ्यादरम्यान लिहिलेल्या डायरीतील मजकूर महाराजांच्या परदेश प्रवासाबाबतच्या दृष्टीकोनावर प्रकाश टाकणारा आहे. हा प्रवास कसा फायदेशीर ठरतो या संदर्भातील नोंदी वाचणे मनोरंजक ठरेल. मे १९०० मधील हा नमुना म्हणूनच पुढे दिला आहे.

डायरीतील काही पाने- युरोप ट्रिप सहावी, मे १९००

 “या डायरीतल्या पानात १९०० पर्यंत मी केलेल्या पाच ट्रीप संबंधीच्या नोंदी केलेल्या आहेत. या नोंदीतील माझी निरीक्षणं वेगवेगळा कालखंड, ऋतुमान आणि वेगवेगळ्या प्रवासाबद्दल आहेत.

१. प्रशासकीय व्यवस्था

 जेव्हा एखाद्या राजास परदेशात जावयाचे झाल्यास त्यास आपल्या रेसिडेंटमार्फत भारत सरकारला याबद्दल आगाऊ कळवावे लागते. राजाचे परदेशात जाणे हे सुरुवातीस वरिष्ठ सरकारला कळविणे होते; पण अलीकडे हळूहळू या पद्धतीत रजेवर जाण्यासारखा बदल झाला आहे. पोलिटिकल डिपार्टमेंटच्या

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / १३