पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मनात राजाच्या परदेश गमनाबद्दल संशय येत गेल्याने या प्रवासाच्या कारणांची तपासणी सुरू झाली. प्रवासाचा दर्शविलेला हेतू खरा आहे काय, हे तपासणे सुरू झाले. राजाच्या गैरहजेरीत राज्यप्रशासनाची व्यवस्था काय? यातून वरिष्ठ सरकारचे अप्रत्यक्ष दबाव सुरू होऊ लागले. राजाने परदेश प्रवासात सरकारचा पोलिटिकल ऑफिसर बरोबर न्यावा, असे बंधन सुरू झाले. खरे तर या राजकीय अधिकाऱ्याची प्रवासात काहीच मदत होत नाही. उलट त्यांची सोबत म्हणजे फालतू संगत आणि खर्चाची नासाडी होय. त्यांच्यामुळे प्रवासाचा कोणताही चांगला हेतू साध्य तर होत नाही; परंतु राजाच्या मनात चीड आणि संतापच निर्माण करतात. राजाच्या खर्चाने सोबत असलेल्या राजकीय अधिकाऱ्यांच्या आवडीनिवडी सांभाळण्याचे काम डोकेदुखीच होऊन बसते.

२. प्रवासामुळे राज्यातील गैरहजेरी

 परदेश प्रवासाच्या निमित्ताने बडोद्यापासून दीर्घकाळ मी दूर राहणे माझ्या प्रजेला न आवडणारी गोष्ट आहे. प्रकृती अस्वास्थ्य हे माझ्या प्रवासाचे मूळ कारण आहे. प्रवासाने माझ्या कृ सुधारणा होते आणि नव्या उत्साहाने प्रजेची कामे करू लागतो. सुरुवातीस काळ्या पाण्याच्या प्रवासाच्या अनिष्ट भीतीने माझ्या सोबत येण्यास नकार देणारेही परदेश प्रवासास उत्सुक आहेत. यात काही निरक्षर आप्तही आहेत. विलायत बघण्याच्या ओढीने अलीकडे काहीजण स्वतःच्या खर्चानेही येण्यास तयार

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / १४