पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

सल्ला डॉक्टरांनी दिला. या दौऱ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराजांनी सामाजिक वनीकरणाचा आदेश या दौऱ्यातून दिला. त्याचप्रमाणे महसूल व सर्वेक्षण विभागाचे प्रश्न मार्गी लावले. याच दौऱ्यातून महाराजांनी बडोद्यात कार्यरत असणाऱ्या फेलीसी या इटालियन शिल्पकाराला खालील शिल्पे करण्याचा आदेश दिला.

१. चित्यांचा एक कळप व त्यांना पाळणारी व्यक्ती यांचे शिल्प.
२. नृत्य मुद्रेमध्ये तंजावरच्या तरुण नर्तिका.
३. गायनाची महफिल, महिला गायिका व तबलची.
४. विविध जातींचे प्रतिनिधित्व करणारा माणसांचा समुदाय.

उदा. १. गुजराती पुजारी, २. साधारण कामगार, ३. भिश्ती, ४. घोडेस्वार, शिपाई.

 हे सर्व पुतळे, शिल्प बनवून घेण्याचा महाराजांचा उद्देश होता की इतक्या सगळ्या लोकांच्या राहणीमान व वेशभूषेबद्दल लोकांना माहिती मिळावी.

 हा दौरा बडोदा राज्याच्या औद्योगिक विकासासाठी महत्वाचा ठरला. कारण या दौऱ्यात महाराजांना इंग्लंडमध्ये औद्योगिक विकासामुळे खेडी कशी समृद्ध झाली हे पाहायला मिळाले. यातून बडोद्यात सुरु असलेल्या उद्योगविषयक कामाला गती देणे शक्य झाले. याच दौऱ्यात बुटाच्या लेस तयार करणाऱ्या कारखान्याची योजना करण्याचे आदेश महाराजांनी दिले. भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण, मुक्या प्राण्यांबाबत होणाऱ्या

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ३०