पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लोकांनी नवीन छापखाने व वर्तमानपत्र सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. ७. पोलीस अधिकाऱ्यांनी न्यायालयात येताना आपला गणवेश परिधान करणे आवश्यक आहे. ८. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेज, मुंबईला १००० रु. ची देणगी दिली. ९. हुजरे वर्गास प्रशिक्षण देण्यासाठी एक शाळा स्थापन केली. १०. शारीरिक शिक्षण व बलसंवर्धनासाठी शाळेत मल्लांकरिता पहेलवानांना नियुक्त करावे. ११. तंजावरहून नृत्यकलेचे शिक्षण देणारे कलाकार आणले व त्यांचे वर्ग केले. १२. भारतीय साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी समिती स्थापन. १३. पाटणच्या जैन ग्रंथांच्या 'जुन्या प्रतींचे पुनर्लेखन. १४. भिल्ल, कोळी इ. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळांची स्थापना करून त्यांना अन्न, शिक्षण, साहित्याचे अनुदान देण्याच्या आज्ञा दिल्या. महाराजांचे वरील आदेश आणि तिसऱ्या दौऱ्यातील महाराजांच्या चिंतनाचे प्रतिबिंब महाराजांच्या वरील धोरणाबाबत दिसल्यास आश्चर्य नाही.
चौथा प्रवास : १८९३

 महाराजांचा चौथा प्रवास कार्लसबाद येथे झाला. १ मे १८९३ ते २९ ऑक्टोबर १८९३ असा एकूण ५ महिने २८ दिवसांचा हा दौरा होता. मागच्या दौऱ्याप्रमाणे या दौऱ्यातही ब्रिटीश प्रशासनाशी महाराजांचा संघर्ष झाला. महाराजांसोबत परदेश दौऱ्यात ब्रिटीश राजकीय अधिकारी नेमाल्यावरून हा संघर्ष होता. याबाबत १९ ऑगस्ट १८९३ रोजी कर्नल रेई यांना

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास /