पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुस्लीम दंगे, बडोदा टांकसाळ, रेल्वे विभाग, खिचडी योजनेतील दुरुस्त्या याबाबत आपली मते व आदेश दिले. या दौऱ्यातील एक क्रांतिकारक आदेश म्हणजे अमरेली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या सक्तीच्या शिक्षणाचा आदेश होय. याबरोबरच सयाजी सरोवरातील पाण्यावरचा जलशक्ती प्रकल्प, तीन रेल्वे मार्गांची बांधणी, राज्याच्या न्यानिक प्रशासनाचा इतिहास लिहिण्याचे आदेश, एस. एम. शितोळे यांना कृषी अध्यनासाठी इंग्लंडला पाठवले. इंग्लंडमध्ये कुकरी शिकणारे नामदेवराव कदम व व्यंकटराव धुलप यांना भारतात येऊन अभ्यास करण्याचे आदेश, नानासाहेब शिंदे यांना शिष्यवृत्ती वाढवून देण्याचा आदेश दिला. अशा प्रकारे अनेक मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याच्या सुचना हे महत्वाचे आदेश महाराजांनी या परदेश प्रवासात दिले.

पाचवा प्रवास : १८९३

 या दौऱ्यात महाराजांनी इंग्लंड, स्कॉटलंड, फ्रान्स, ऑस्ट्रिया, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली ( जीनिव्हा, फ्लॉरेन्स), तुर्कस्तान (कान्स्टॉटिनोपल ) या देशांचा प्रवास केला. हा दौरा १५ डिसेंबर १८९३ ते १८ जानेवारी १८९५ असा १३ महिने ३ दिवस कालावधीचा होता. चौथ्या युरोप प्रवासानंतर महाराज फक्त दीड महिना भारतात राहिले. महाराजांचे वारंवार परदेशी जाणे ब्रिटीश प्रशासनाला खटकत होते. त्यामुळे प्रत्येक परदेशवारी दरम्यान ब्रिटीश प्रशासन आणि महाराज यांच्यात यासंदर्भाने पत्रव्यवहार

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ३४