पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सहावा प्रवास : १९००

 पाचव्या प्रवासानंतर महाराजा ५ वर्षे ४ महिने बडोद्यात राहिले. पाचव्या प्रवासावरून बडोद्यात आल्यावर महाराजांच्या असे लक्षात आले की राज्याच्या कायद्याची स्थिती फारच विस्कटलेली आहे. याला जे अधिकारी जबाबदार होते त्यांना बदलून महाराजांनी नवीन अधिकारी नेमले. सरकारी यंत्रणा मुळापासनू बदलून टाकण्याचा महाराजांनी झपाटा लावला. परिणामी दोनच वर्षात राज्याचा दबदबा आणि बडोद्याची प्रतिष्ठा पुन्हा उंचावली.

 सहाव्या परदेश प्रवासाचे कारण यावेळी महाराजांची तब्येत हे नव्हते तर महाराणींची बिघडलेली तब्येत हे होते. बडोद्यातील दुष्काळ आणि प्लेगची साथ यांच्या पार्श्वभूमीवर हा सहावा प्रवास महाराजांनी के ला. आजपर्यंतच्या परदेश प्रवासांचा विचार करता एवढ्या अनिच्छेने महाराजांनी के लेला हा पहिला प्रवास होता. फ्रान्स देशाचा हा परदेश प्रवास १९ मे १९०० ते ११ जानेवारी १९०१ पर्यंत एकूण ७ महिने २३ दिवसांचा होता.

 या दौऱ्याबाबतच्या महाराजांच्या भावना व्यक्त करणारे दोन सदर्भ फार महत्वाचे आहेत. कारण त्यातून महाराजांच्या त्यावेळच्या मनोस्थितीचे दर्शन घडते. यातील पहिला सदर्भ म्हणजे कर्नल रॅवन्झॉ यांना १८ मे १९०० रोजी लिहिलेले पत्र. या पत्रात महाराज म्हणतात, ‘बडोदा सोडताना आजच्या इतका असतं ुष्ट मी कधीच नव्हतो. दुष्काळपीडित गरीब जनतेची तुम्ही

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / 39