पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिनोर, करजन आणि पदरा या तालुक्यांचा दौरा फेब्रुवारीमध्ये केला. ५ फेब्रुवारी १९०९ ला राज्यातील शिक्षण व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी मि. कॉटन यांची नियुक्ती केली. ५ मार्च १९०१ ला महाराजांनी संपत्तीचे पंजीकरण, विधवा पुनर्विवाह, बालविवाहविरोधी कायदा इ. संबंधी कायदे करण्याचे आदेश महाराजांनी मंत्र्यांना दिले होते. ही बडोद्यातील हिंदू कोड बिलाची पायाभरणी होती. ब्रिटीश भारतात हिंदू कोड बिलाची चर्चा आणि प्रयत्न यानंतर १८ वर्षांनी १९१९ मध्ये सुरु झाले. यातून सयाजीरावांच्या प्रागतिक विचाराचा दर्जा आपल्या लक्षात येईल. महाराज सहाव्या प्रवासात युरोपमध्ये असताना कर्झन सर्क्युलर हे प्रकरण भारतात घडले. हे कर्झन सर्क्युलर भारतीय राजांना परदेशात जाण्यासाठी प्रतिबंध घालणारे होते. याबद्दल महाराजांनी लेखी आक्षेप घेत आपली भूमिका परखडपणे मांडली.
 १९०२ मध्ये महाराजांना ताप आणि कफ यांचा त्रास सुरु झाला. वैद्यकीय सल्ल्यानुसार काही महिने समुद्र प्रवासासाठी जाण्याचे महाराजांनी ठरवले. बडोद्याच्या रेसिडेंटला याबाबत सूचना दिली. परंतु कर्झन सर्क्युलरनुसार दौऱ्याला मान्यता घेणे, योग्य कारणे देणे बंधनकारक झाले. हा संघर्ष १९०५ पर्यंत चालला. दरम्यान २७ सप्टेंबर १९०४ रोजी रेसिडेंटला पत्र लिहून महाराजांनी परदेश दौऱ्यावर जाण्याची गरज स्पष्ट केली. रेसिडेंटला महाराजांचा ठाम निर्णय लक्षात आला. तो काहीना

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्र