पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काही कारण दाखवून दौरा टाळण्याचा प्रयत्न करत होता. परंतु शेवटी १ मार्च १९०५ ला महाराज आपल्या युरोप दौऱ्यावर रवाना झाले. या दौऱ्यात महाराजांनी लंडनच्या सोसायटी ऑफ आर्ट्स (भारतीय विभाग) च्या सभेचे अध्यक्षपद भूषविले.

 पुढे बर्लिन येथे जर्मनी व अमेरिका यांच्या द्विपक्षीय बौद्धिक आदान-प्रदान विषयक व्याख्यानमालेचे अध्यक्षही महाराज होते. तेथून महाराज ऑस्ट्रिया दौऱ्यावर गेले. तेथे व्हेनिस येथील उद्योगांचा महाराजांनी अभ्यास के ला. त्यातील काही उद्योग बडोद्याला नेता येतील का हा हेतू यामागे होता. तेथून ग्रीस, इटली, स्वित्झर्लंड, पॅरीस, स्पेन मार्गे महाराज न्यूयॉर्क ला गेले. येथे त्यांनी नॅचरल हिस्ट्री म्युझियम पाहिले. तेथून वॉशिंग्टनला जाऊन २६ मे १९०६ रोजी राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांच्याशी प्रदीर्घ चर्चा के ली. तेथील दोन शैक्षणिक ससं ्था, एक महिला महाविद्यालय आणि कायदेविषयक कें द्र यांना महाराजांनी भेटी दिल्या. तेथून ते फिलाडेल्फियाला गेले. तेथे त्यांनी उद्योगधंद्यांची पाहणी के ली. तेथून हावर्ड व शिकागोला भेट देण्यासाठी पुढे निघाले. येथील विविध शैक्षणिक ससं ्थांना त्यांनी भेटी दिल्या. तेथुन ते कोलोरॅडोला गेले. तेथे त्यांनी खान व्यवसायाची पाहणी के ली तसेच तेथील रेडइडियन लोकांमध्ये आपला वेळ आनंदात घालवला. तेथून सॅन फ्रान्सिस्को येथील ओरेगॉनच्या औद्योगिक क्षेत्राला भेट दिली. ३ महिने अमेरिके चा प्रवास करून महाराज युरोपला आले. तेथून १६ नोव्हेंबर १९०६ ला भारतात पोहचले.

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / 44