पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिली. त्यानंतर किओतो येथील विद्यापीठाला आणि मुख्यतः बुद्धाची शिकवण देणाऱ्या बौद्ध शाळेलाही महाराजांनी भेट दिली. २३ मे १९९० ला जपानच्या राजा राणीला भेट देऊन सॅन्फाफ्रान्सिस्को मार्गे न्यूयॉर्कला गेले तेथे हार्वर्ड विद्यापीठातील डॉ. लानममॅन आणि बुमसप यांच्याबरोबर महाराजांच्या बैठकी झाल्या. याच दरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांची भेट घेतली. तेथून ते इंग्लंडला गेले. इंग्लंड मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ग्रंथालयाला भेट, तेथून बोर्न एंड येथील ब्रिटीश एम्पायर क्लबला महाराजांनी भेट दिली. या क्लबचे सदस्यत्व महाराजांना दिले गेले. या दौऱ्यात रॉयल जिऑग्राफिकल सोसायटीने महाराजांना सन्माननीय सभासदत्व बहाल केले. तसेच नैतिक शिक्षण समुदायाचे उपाध्यक्ष म्हणून सयाजीरावांची निवड झाली. तेथून ते भारतात परतले.

नववा प्रवास : १९११
 चीन, जपान, सॅन्फ्रान्सिस्को, कॅनडा, लंडन असा हा दौरा २२ एप्रिल १९१९ ते १० नोव्हेंबर १९११ असा ५ महिने १९ दिवसांचा होता. या दौऱ्यात इंग्लंडच्या सम्राटाच्या राज्याभिषेक सोहळ्यास महाराज हजर राहिले. महत्वाचे म्हणजे २८ जुलैला लंडन विद्यापीठात भरलेल्या पहिल्या जागतिक मानववंश परिषदेच्या एका सत्राचे अध्यक्षपद महाराजांनी भूषविले व भाषण केले. १४ सप्टेंबर रोजी स्कॉटलंड येथील सेंट अंड्रयू विद्यापीठाच्या ५०० व्या वर्धापनदिनाचे पाहुणे म्हणून सयाजीराव हजर राहिले

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ४८