पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सप्टेंबरमध्ये महाराजांना फ्रेंच भाषा शिकण्याची इच्छा झाल्याने त्यांना व कुटुंबीयांना फ्रेंच भाषा शिकवण्यासाठी कु. लक्स यांची तात्पुरती नेमणूक केली. पुढे १६ ऑक्टोबर १९२४ ला लक्स यांना नोकरीत कायम करण्यात आले. वास्तूतज्ञ ॲबडेन स्टॉक यांनी डिझाईन केलेली फ्रान्समधील उत्तर विभागीय रेल्वे कर्मचाऱ्यांची आधुनिक आणि सर्व सोईंनीयुक्त वसाहत पाहण्यासाठी महाराज गेले होते.

 सयाजीरावांनी ७ डिसेंबर १९२४ ला पॅरिसमध्ये एक घर विकत घेतले. महाराजांनी फ्रेंच दुभाषकाकडून घरासंबंधी सर्व कागदपत्रे समजून घेतल्यानंतरच त्यावर सह्या केल्या. महाराजांनी भारतातून सुट्टीला लंडनमध्ये आलेल्या व्हाइसरॉय अर्ल रिडींग यांची भेट घेतली. ब्रिटिश इंडियन युनियन आणि नॉर्थ ब्रुक सोसायटी यांनी लॉर्ड रिडींग यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. त्या सोहळ्यास महाराज उपस्थित होते आणि तेथे त्यांनी प्रभावी भाषणही केले.

 यावेळी महाराजांचा रस्सेलमधील मुक्काम एकूणच घाईगर्दीचा व धावपळीचा होता. बडोदे राज्यातील प्रश्न, पॅरिसच्या घराची दुरुस्ती, सजावट, त्याचवेळी इंग्लंडमधील स्थावर संपत्तीचा निर्णय या बाबीमध्ये महाराज व्यस्त राहिले. त्याचवेळी पाहुणे, मेजवानी, वाटाघाटी याही बाबी महत्वाच्या होत्या. श्री. विजेरी यांच्या राज्यासाठी सेवेचा प्रश्न, शिल्पकार बोस यांच्या सेवाशर्ती व इतर वाटाघाटी. आत्मचरित्रासाठी नेमलेल्या श्री.

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ५५