पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नेतृत्वाखाली पाठविलेल्या स्काऊट्सची भेट घेतली. त्यावेळी हजर असलेल्या १० मुलांना २० पौंडांची देणगीही महाराजांनी दिली. डॉक्टर मोडक व श्री. काटदरे यांना पिटमनर्स कॉलेजमध्ये जेमॉलॉजी (रत्नांच्या शास्त्राच्या) अभ्यासक्रमाविषयी चौकशी करण्यासाठी लंडनला पाठविले. महाराजांनी श्री. एस. आर. दिवेकर या संस्कृत पंडिताशी बडोद्यातील कायद्याच्या शब्दकोशात संस्कृत आणि मराठी शब्द वापरणे किंवा पर्यायी नवीन आणि समर्पक शब्दप्रयोगांचा समावेश करण्याविषयी सविस्तर चर्चा केली. महाराजांनी १९२८ मध्ये लंडनचे मेसर्स कार्टियर आणि पॅरिसच्या असोसिएट यांच्यासोबत बडोदा संस्थान बहुमूल्य रत्नांची खरेदी कार्टियर यांच्याकडून करेल असा करार केला होता. परंतु या बंधनामुळे संस्थानची गैरसोय होत असल्याचे सयाजीरावांच्या लक्षात आले. त्यांनी जॅक कार्टियर यांची भेट घेवून या करारातील शर्तींचा पुनर्विचार करावा आणि त्यामध्ये योग्य ती सुधारणा करावी असे सांगितले. काही काळाने या करारात सुधारणा करण्यात आल्या. महाराज ९ महीने २६ दिवसांचा हा दौरा संपवून १० जानेवारी १९३० ला मुंबईत पोहोचले.

विसावा प्रवास : १९३०

 महाराजांची विसावी युरोपवारी १५ मार्च १९३० ते ९ फेब्रुवारी १९३१ अशी १० महीने २६ दिवसांची होती. या प्रवासात सयाजीरावांनी १५ ऑक्टोबरला बर्लिन ट्रेप्टो वेधशाळेला भेट

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ६२