पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देण्यात आली. कलकत्ता विद्यापीठातील पदवीधर श्री. मंडल या दलित विद्यार्थ्याला कायद्याच्या अभ्यासासाठी १२५ पौंडांची मदत केली. दि ईस्ट इंडिया असोसिएशन, ३ व्हिक्टोरिया स्ट्रीट, लंडन या संस्थेचे अध्यक्ष सर फ्रान्सिस यंगहजबंड यांना महाराजांनी युरोप खंडातील अभ्यासकांना लंडनमध्ये भारतीय कला व संस्कृती या विषयावर व्याख्याने देण्यासाठी प्रतिवर्षी १०० पौंड प्रमाणे ५ वर्षे देणगी दिली. सयाजीरावांनी दिलेल्या या निधीचे नामाभिधान 'दि महाराजा गायकवाड लेक्चर फंड' असे करण्यात आले. सयाजीरावांनी लंडन विद्यापीठाचे पी.एच. डी. असलेले डॉ. लेकासुंदरम यांना भारताच्या आंतरराष्ट्रीय स्थानाविषयी लिहीत असलेल्या पुस्तकासाठी ३०० पौंडांची रक्कम दिली.

एकविसावा प्रवास : १९३१

 महाराज फ्रान्स, स्वित्झर्लंड, इंग्लंड, जर्मनी, इटली, स्कॉटलँड या देशांच्या सफरीवर २३ मे १९३१ ला निघाले. यावेळी महाराजांनी श्री. ऐतकेन यांनी तयार केलेल्या आधुनिक घटनेच्या (संविधान) नोंदी, डायसींचे घटनात्मक कायदा आणि अनेक मराठी-इंग्रजी पुस्तकांचे वाचन केले. महाराजांनी बडोद्याचे डॉ. के. जी. दास यांना त्यांच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी १०५ पौंडांची आर्थिक मदत दिली. लंडनमधील दुसऱ्या गोलमेज

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ६४