पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एथेनाउन, कार्लटन, युनायटेड सर्व्हिस, रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेर्स, बुक्स कॅव्हेलरी, एम. सी. सी यासारख्या प्रसिद्ध संस्था-संघटनांचे मानद सदस्यत्व स्वीकारले. १० जून १९३७ ला केंब्रिज विद्यापीठातर्फे सयाजीरावांना एल. एल. डी. ही पदवी देण्यात आली.
विस्बादेन येथील गोल्फ क्लब हे महाराजांचे आवडते ठिकाण होते. त्यांनी येथील खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी असलेल्या जागेच्या (पॅव्हेलियनच्या) दुरुस्तीसाठी २०० मार्क्सची देणगी दिली. नॉर्वेतील बर्गन या शहरातील वस्तुसंग्रहालयाला भेट दिल्यानंतर सयाजीरावांनी आपल्या अधिकाऱ्यांजवळ या संग्रहालयाच्या धर्तीवर बडोदा संग्रहालय उभारण्याची इच्छा व्यक्त केली. महाराज या प्रवासावरून भारतात परतल्यावर काही दिवस मुंबईत राहिले होते. त्यावेळी त्यांनी शिक्षणात मागासलेल्या वर्गासाठी असलेल्या श्री. शाहू छत्रपती बोर्डिंगचे संस्थापक साताराचे भाऊराव पाटील यांना भेटीसाठी बोलावून ३,००० रु. विश्वस्त निधीत ठेवण्यासाठी आणि १,००० रु. देणगी स्वरुपात दिले.
सव्वीसावा प्रवास : १९३८

 महाराज आपल्या शेवटच्या म्हणजे सव्वीसाव्या युरोप दौऱ्यास ११ मार्च १९३८ ला जोधपूर विमानतळावरून विमानाने निघाले. लंडनमध्ये असताना सयाजीरावांनी एकाचवेळी अनेक विषयांचा

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ७२