पान:महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दादासाहेबांनी या जर्मन जादूगाराकडून रासायनिक, तांत्रिक, भ्रांतीकृत, पत्याची जादू वगैरे प्रकार शिकून घेतले. त्याचा उपयोग पुढे चित्रपट व्यवसायात त्यांना ट्रिक फोटोग्राफीसाठी खूप झाला. इ.स. १९०१ सालाच्या अखेर दादासाहेब प्रो. केल्फा ( फाळके या आडनावाचा उलटा क्रम) या नावाने जाहिररीत्या प्रयोग करू लागले होते आणि जादूगार म्हणून त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. त्यांनी चित्रपट निर्मिती सुरू केल्यावर आपल्या जादूच्या प्रयोगाचे चित्रीकरण करून ठेवले होते. इ.स. १९०२ साली दादासाहेबांचा द्वितीय विवाह बडोद्याला शंकर वासुदेव करंदीकर यांची कन्या व किर्लोस्कर नाटक कंपनीचे प्रमुख गायक नट भाऊराव कोल्हटकर ( भावडया) यांची भाची सरस्वती हिच्याशी झाला.

 त्यावेळेस अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, जपान येथे चलचित्रपट निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यात अमेरिका सर्वात आघाडीवर होती. दादासाहेब जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण पूर्ण करत असताना इ.स. १८८५ मध्ये अमेरिकेच्या जॉर्ज ईस्टमन या कल्पक गृहस्थाने चलत चित्रपट तयार करण्यासाठी लागणारी फिल्म फीत तयार केली आणि योगायोग असा की, दादासाहेब " कलाभवन” मध्ये शेवटच्या वर्षाला असताना जॉर्ज इस्टमनने आणखी सुधारणा करून सध्या सर्वांना माहिती असलेली फिल्म तयार केली. हा चित्रपट कलेच्या प्रगतीचा

महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके / १५