पान:महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करून घेऊन त्यांना मजुरी वाटपाचा अधिकार देण्याचा आदेश.
१०) वेतन अदा करण्यातील अनियमितता व भ्रष्टाचार रोखून पैसा थेट मजुरांच्या हाती पडावा व हजेरीपत्रके नीट भरली जावीत यासाठी विशेष निरीक्षक नेमण्याचा आदेश. पात्र निरीक्षक तयार करण्यासाठी सुरू केलेल्या प्रशिक्षण वर्गात सैन्यातील कर्मचाऱ्यांना हजेरीपत्रकातील नोंदी ठेवण्यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात आले.
११) शारीरिकदृष्ट्या दुर्बल मजुरांचे वर्गीकरण वेगवेगळ्या वर्गातील मजुरांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे कामे देण्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश.
१२) चौदा वर्षाखालील मुलांना साप्ताहिक आणि सर्व मजुरांना अमावस्या व पौर्णिमेला पाक्षिक सुटी देण्याचा आदेश.
१३) कडी, बडोदा आणि अमरेली या सुभ्यांतील मदतकार्य सुरू असलेल्या ठिकाणी नवजात बालके आणि विकलांगांसाठी तात्पुरत्या राहुट्या उभारण्यासाठी ४,००० रु. ची तरतूद करण्याचा आदेश.
१४) मदतकार्यातील कामगारांच्या तक्रारी आणि दौऱ्यादरम्यान महाराजांना भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याचा मंत्र्यांना आदेश.
१५) शेतसारा वसुलीसाठी कोणत्याही कठोर उपाययोजना करण्यास प्रतिबंध घालणारा आदेश.

महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी / १७