पान:महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठेवताना तथाकथित उच्चवर्गीयांचा 'सन्मान' जपणारा सयाजीरावांसारखा दुसरा राज्यकर्ता समकालीन भारतात आपल्याला आढळत नाही.
 सन २००० नंतर गेल्या २० वर्षात या ग्रंथाच्या अमेरिकेतून ३ आवृत्त्या, इंग्लंडमधून १ आवृत्ती आणि महाराष्ट्रातून इंग्रजीमध्ये २, हिंदी आणि मराठीतून प्रत्येकी १ अशा एकूण ८ आवृत्या निघतात ही बाब आशादायक आहे. असे असले तरी या ग्रंथाचे व्यवस्थापनाच्या ज्ञानशाखेने ओळखलेले नाही. आधुनिक भारतातील प्रत्येक राज्यकर्त्याला आणि प्रशासकाला त्याच्या प्रशिक्षणात या ग्रंथाचा अभ्यास अनिवार्य केला असता तर भारतातील आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा दर्जा कितीतरी पटीने उंचावला असता. सयाजीरावांच्या सर्वच कामाला आजअखेर बेदखल केल्याच्या पार्श्वभूमीवर हे असे झाले नाही याचे आश्चर्य वाटत नाही.

महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी / २५