पान:महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
आणि
दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी

 महाराजा सयाजीराव यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, धोरणांचा आणि कृतीकार्यक्रमांचा जेव्हा आपण सूक्ष्मपणे अभ्यास करतो तेव्हा महाराजांचे विशेष वेगळेपण जाणवते. ते वेगळेपण म्हणजे महापुरुषांच्या अभ्यासाच्या भारतातील रूढ चौकटीत महाराजांचे व्यक्तिमत सामावत नाही. कारण रूढ चौकटीत त्यांच्यातील क्रांतिकारक माणूस आणि प्रशासक आपल्याला पूर्ण अंशाने सापडत नाही. याचे कारण म्हणजे त्यांची बहुपदरी कारकीर्द होय. याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराजांचे हुजूर हुकूम होय. महाराजांनी अगदी छोट्या-छोट्या बाबींवर हुजूर - हुकूम काढले आहेत. त्यातून त्यांच्यातील बहुपदरी माणूस सापडतो. अगदी हॉटेलमधील वेटरसाठी त्यांनी हुजूर हुकूम काढला होता. या हुकुमातील कलमे आपण जसजशी वाचत जातो तसतसे हा राजा किती सखोल, शिस्तबद्ध आणि परिपूर्ण विचार करत होता याचा अनुभव येतो. या हुजूर हुकुमात वेटरने टेबलपासून किती अंतरावर उभे राहावे, कसे उभे राहावे, ग्राहकाशी बोलताना

महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी / ६