पान:महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(१८९६), विधवा पुनर्विवाह (१९०१), धार्मिक स्वातंत्र्य (१९०१), बालविवाह प्रतिबंध (१९०४), सार्वजनिक दानधर्म (१९०५), हिंदू कोड बिल (१९०५), हिंदू विवाह (१९०५), परोपकारी संस्था (१९०७), विशेष विवाह कायदा (१९०८), हिंदू दत्तक विधान (१९१०), बालसंरक्षण (१९९२), पुरोहित (१९१५), वफ्फ (१९२७), हिंदू लग्नविच्छेद (१९३१), माता कल्याण (१९३२) ख्रिचन विवाह, हिंदू स्त्रियांना संपत्तीत हक्क, जाती छळ निर्मूलन, संन्यास दीक्षा जैन, पारसी विवाह आणि घटस्फोट (१९३३), मागासवर्ग संरक्षण (१९३८), सामाजिक दुर्बलता निर्मूलन (१९३९), याचप्रमाणे सरकारी नोकरीत स्त्रियांना संरक्षण, सर्व जातींसाठी संस्कृत पाठशाला, एक गाव एक मंदिर (गावातील अनेक मंदिरांमुळे सामाजिक दरी निर्माण होते, त्याचे व्यवस्थापन व्यवस्थित होत नाही. गावातील सर्व जात-धर्मीयांनी एकत्रित यावे म्हणून गावात एकच मंदिर असावे असा महाराजांचा विचार होता.) असे अनेक कायदे केले. लोकांना कायद्याप्रमाणे मत आणि मन परिवर्तन करून आचरण करण्यास भाग पाडले, त्याप्रमाणे कायद्यांचे स्वतःही तितकेच काटेकोर पालन केले. परिणामस्वरूप बडोद्यातील सामाजिक विषमतेची दरी कमी होऊन सामाजस्वास्थ्य सुधारले. राज्यकर्ता 'सुधारक असल्याने त्यांना कायद्यानुसार अंमलबजावणी करता येत होती. नेमका हाच फरक इतर समाजसुधारक आणि सयाजीराव महाराजांमध्ये होता. समाजसुधारक फक्त सुधारणा करा म्हणून राज्यकर्त्यांकडे

महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद / १३