पान:महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मग सयाजीराव महाराजांना सर्वधर्माचा अभ्यासू अधिकारी पुरुष म्हणून अध्यक्षस्थान मिळाले का? या दुसऱ्या 'शक्यतेकडे पाहिले असता पुन्हा काही प्रश्न आणि शंका निर्माण होतात. भारतासारख्या सनातन आणि परंपरावादी देशात सयाजीराव महाराजांनी सर्वधर्मांचा अभ्यास केला का? त्यानुसार आचरण केले? त्यांची सर्वधर्मांबद्दलची भूमिका काय होती? एक सत्ताधीश म्हणून सर्वधर्मांच्या अभ्यासासाठी काय काय सोयी बडोदा राज्यात केल्या? सोयी केल्या तर त्याचे फलित काय? विद्यार्थ्यांना किंवा अभ्यासकांना स्वतःचा धर्म सोडून दुसऱ्या धर्माच्या अभ्यासाची सोय केली होती? धर्मअभ्यासासाठी किती विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी पाठवले होते? धर्मांचा तुलनात्मक अभ्यास स्वतः केला काय किंवा यासाठी बडोदा राज्यात काय केले? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात. या प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांच्या संपूर्ण जीवनचरित्राकडे चिकित्सकपणे पाहिल्यास अनेक सकारात्मक उत्तरे मिळतात.

 सयाजीराव महाराज दत्तक विधानाने इ.स. १८७५ मध्ये गादीवर आले, तरी औपचारिक शिक्षणानंतर २८ डिसेंबर १८८१ मध्ये राज्यकारभार हाती आला. तेव्हापासून त्यांनी 'धर्मा'च्या अनुषंगाने काय - काय सुधारणा केल्या याचा विचार करावा लागेल. राज्यकारभार हाती येताच १८८२ मध्ये त्यांनी अस्पृश्य आणि आदिवासीयांचे बहुबल असणाऱ्या प्रांतांत प्रथम शाळा

महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद / ८