पान:महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वीकारले. महाराजांनी केलेल्या आर्थिक मदतीबद्दल कोसंबींनी लगेचच तार पाठवून महाराजांचे आभार मानले. यानंतर कोसंबींनी एक महिना कलकत्यास राहून पुण्याला जाण्याची इच्छा महाराजांकडे पत्राद्वारे व्यक्त केली. यास महाराजांनी कोणतीही हरकत न घेता कोसंबींना सहमती कळवली.
 सयाजीराव महाराजांनी दिलेल्या मदतीमुळे कोसंबी कलकत्ता विद्यापीठातून निघून जाऊ नयेत म्हणून कलकत्ता विद्यापीठाने कोसंबींचा पगार १०० रु. वरून २५० रु. केला आणि कोसंबींनी ३ वर्षे कलकत्याला राहावे अशी हमी मागितली. कारण कोसंबी कलकत्ता विद्यापीठात राहिले तर पाली भाषेच्या प्रसाराचे काम अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते असे कुलगुरूंचे मत होते. तसेच त्यांनी 'युनिव्हर्सिटीचा व्हाइस चान्सेलर या नात्याने मी तुम्हास आणखी तीन वर्षे येथे ठेवण्याविषयी महाराजांस विनंती करतो.' असे सांगितले होते. मात्र ‘श्रीमंत गायकवाड महाराजांचा निरोप येथून मागविणे मला रास्त वाटत नाही. मी त्यांना भेटून, जे काही होईल, ते तुम्हास कळवितो.' अशी भूमिका कोसंबींनी घेतली. त्यामुळे कुलगुरूंनी कोसंबींकडे सयाजीराव महाराजांना देण्यासाठी एक पत्र लिहून दिले. या पत्रात कोसंबी कलकत्त्याला राहिल्याने फार फायदा आहे अशा आशयाचा मजकूर होता.

 कलकत्ता विद्यापीठाला राजीनामा पाठवून जस्टिस मुकर्जी व हरिनाथ देव यांचा निरोप घेऊन कोसंबी ऑक्टोबर १९०८

महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी / १२