पान:महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशी तीन वर्षे बौद्ध धर्माचा महाराष्ट्रात प्रसार आणि ग्रंथलेखन करण्यासाठी महाराजांनी वरील शिष्यवृत्ती दिली होती. तसेच महाराजांनी १९९० मध्ये बडोद्यात बुद्धाचा पुतळा जपानहून आणून बसविला. या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर बौद्ध धर्माची तत्त्वे कोरलेली होती. या पार्श्वभूमीवर पुढे १९५६ चे बाबासाहेबांचे बौद्ध धर्मांतरसुद्धा आपल्याला विचारात घ्यावे लागेल.
कोसंबी अमेरिकेत

 १९१० मध्ये धर्मानंदांनी अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठात प्रा. वारन यांच्या बौद्ध धर्मातील 'विशुद्धी मार्ग' या ग्रंथावरील संशोधनात सहकार्य करण्यासाठी बोलविण्यात आले. सयाजीराव महाराजांची परवानगी घेऊन ते १९१० मध्ये हार्वर्ड विद्यापीठात गेले. त्याच दरम्यान महाराज जपानला निघाले होते. महाराज पुढे जपानवरून अमेरिकेला जाणार असल्याने कोसंबींना ते स्वतःबरोबर येण्याचा आग्रह करत होते. परंतु त्यांची प्रवासाची व्यवस्था हार्वर्ड विद्यापीठाने केली असल्याने ते स्वतंत्रपणे अमेरिकेला गेले. अमेरिकावारीला परवानगी देऊन सयाजीरावांचा हातभार लागला. ती बौद्ध धर्माच्या कामासाठी व त्यांचा मुलगा दामोदर यांच्या शिक्षणासाठी फलदायी ठरली. पुढे दामोदर कोसंबी मार्क्सवादी इतिहासकार म्हणून जगविख्यात झाले. यासंदर्भात कोसंबी म्हणतात, 'दरमहा २५० रुपयांची नोकरी सोडून श्रीमंत गायकवाड महाराजांनी दिलेल्या ५०

महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी / १४