पान:महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव


आणि


धर्मानंद कोसंबी


 आधुनिक भारतातील बौद्ध धर्माचा इतिहास विचारात घेता बाबासाहेब आंबेडकर हेच नाव प्राधान्याने पुढे येते. याचे कारण त्यांचे १९५६ चे ऐतिहासिक धर्मांतर हे आहे. परंतु आधुनिक काळात बुद्ध चरित्राच्या अभ्यासाचा पहिला मान कृष्णराव अर्जुन केळुसकर यांना जातो. कारण आधुनिक काळात कोणत्याही भारतीय भाषेत आणि भारतीयाने लिहिलेले गौतम बुद्धाचे पहिले चरित्र केळुसकरांनी लिहिले होते. ते लक्ष्मणराव पांडुरंग नागवेकर यांनी त्यांच्या कर्नाटक प्रेसद्वारे १८९८ ला प्रकाशित केले. भारतातील बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनाची खऱ्या अर्थाने सुरुवातच होती. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बौद्ध तत्त्वज्ञानाची कालातीतता ओळखून याच दरम्यान बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनाला आरंभ केला. १८९८ मध्ये केळुसकर हे बुद्ध चरित्र घेऊन मुंबई येथे सयाजीरावांना भेटले होते. सयाजीरावांनी त्यांचे बुद्धचरित्र चाळून केळुसकरांशी

महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी / ६